भाचीच्या हळदीत नाचण्यावरून सख्ख्या चुलत भावांमध्ये वाद ; तरूणाचा छातीत चाकू भोसकून खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून सख्ख्या चलुत भावांमध्ये चांगलाच वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की त्यामध्ये एकाने तरूणाच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्याचा खून केला. ही खळबळजनक घटना औरंगाबाद शहरातील चिखलठाणा येथील ऋषिकेशननगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

आकाश मारोती शेळके (वय 20) असे खून झालेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शेळके आणि सचिन दशरथ शेळके हे दोघे सख्ख्ये चुलत भाऊ भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ऋषिकेशनगर परिसरात आले होते. आकाश हा संजय नगर परिसरात रहावयास होता. आकाश आणि सचिन यांच्यामध्ये कार्यक्रमात नाचण्यावरून चांगलाच वाद झाला.

वाद एवढा विकोपाला गेला की चक्‍क सचिनने त्याच्याकडे असलेल्या चाकूने आकाशच्या छातीवर वार केले आणि चाकू त्याच्या छातीत भोसकला. गंभीर जखमी झालेल्या आकाश शेळकेचा यामध्ये मृत्यू झाला. काही क्षणातच सचिन तेथून पसार झाला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सिडको एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Loading...
You might also like