व्हिडीओ शूट करून तरुणाने केली आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहरातील न्यायनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने मोबाईलवर व्हिडीओ शूटींग सुरु करून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलमध्ये तरुणाने मुत्यूपूर्वी केलेले ५७ मिनीटांचे शुटींग आढळून आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून तरुणाने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही.

मुकेश सुधाकर साळवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुधाकर साळवे हे पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोल-मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांना तीन मुले असून मुकेश हा तिसरा मुलगा आहे. त्यांची तीनही मुले काम करतात. मुकेश हा एका वॉशिंग सेंटरमध्ये कामाला आहे. सुट्टी असल्याने तो घरीच होता. दुपारी मुकेशचे वडील जेवण करण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी मुकेशने घराच्या छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

सुधाकर साळवे यांनी या घटनेची माहिती पुंडलीकनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुकेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतवरून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मुकेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पोलिसांना घटनास्थळी मुकेशचा मोबाईल सापडला आहे. पोलिसांनी मुकेशचा मोबाईल तपासला असता मोबाईलमध्ये ५७ मिनीटाचा एक व्हिडीओ दिसला. तर दुसऱ्या १३ मिनीटाच्या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पुंडलीकनगर पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या