शहिद सैनिक ‘औरंगजेब’चे दोन्ही भाऊ सैन्यात दाखल ; बदला घेण्याचा केला निश्चय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या औरंगजेबचे दोन्ही भाऊ भारतीय सेनेत भरती झाले आहेत. गेल्या वर्षी १४ जूनला औरंगजेबचे अपहरण करून दहशतवाद्यांनी हत्या केली होती. आता औरंगजेबचे भाऊ मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर सेनेत भरती झाले आहेत. सेनेत भरती झाल्यावर शब्बीर यांनी म्हटले की, आपला प्रदेश आणि देशाच्या सेवेसाठी तसेच भावाचा बदला घेण्यासाठी आम्ही सेनेत भरती झालो आहोत.

औरंगजेब यांचे वडील या प्रसंगी म्हणाले की, माझ्या मुलाला दहशतवाद्यांनी धोका देऊन मारले. जर तो लढाई करून मृत्यू पावला असता तर मला काही दुःख झाले नसते. परंतु धोका देऊन त्याचा खून करण्यात आला. आता माझे दोन्ही मुले सैन्यात भरती झाली आहेत. माझ्या मुलाचा खून करणाऱ्यांशी मला स्वतः लढू वाटते. पण आता माझे दोन्ही मुले औरंगजेबच्या हत्येचा बदला घेतील.

भावाच्या हत्येचा बदला घेऊ – तारिक

औरंगजेब चा लहान भाऊ तारिक मी म्हणाला की, ज्या प्रकारे माझ्या भावाने देशासाठी जीव दिला आणि रेजिमेंटचे नाव उंच केले अगदी त्याप्रमाणे आम्ही चांगले काम करू. तसेच भावाच्या खुनाचा बदला घेऊ. आम्ही देशासाठी जीव द्यायला पण मागे पुढे पाहणार नाही. शब्बीरने म्हटले की, भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मी भरती झालो आहे. मी माझ्या भावाचे आणि पंजाब रेजिमेंटचे नाव रोशन करेल.

आरोग्यविषयक वृत्त