‘या’ 5 आयुर्वेदिक काढ्याने त्वरित वाढेल तुमची प्रतिकार शक्ती, जवळही येणार नाही ‘कोरोना’ व्हायरस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना विषाणूपासून बचावासाठी प्रत्येकजण आयुर्वेदाकडे वळत आहे. आयुष मंत्रायलयाने देखील यावर जोर दिला की, आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा, हळद, गिलॉय इत्यादींचे काढे पिल्याने मदत होईल. हे केवळ कोरोना विषाणूपासूनच आपले संरक्षण करणार नाही, तर इतर बर्‍याच रोगांपासून आपले संरक्षण करेल. जाणून घ्या ५ आयुर्वेदिक काढे तयार करण्याची पद्धत…

गिलॉयचा काढा

गिलॉयचा काढा रोग प्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला बर्‍याच रोगांपासून वाचवेल. तुम्ही घरी सहजपणे हा काढा कसा बनवू शकता ते जाणून घ्या.

गिलॉयचा काढा बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

गिलॉयचा एक तुकडा
४-५ तुळशीची पाने
२ काळी मिरी
थोडी कच्ची हळद
थोडे आले
थोडी अश्वगंधा

तयार करण्याची पद्धत

एक गिलॉयचा तुकडा, ४-५ तुळशीची पाने, २ काळी मिरी, थोडी कच्ची हळद, थोडे आले, थोडी अश्वगंधा एका भांड्यात घ्या आणि ते बारीक करा. यानंतर एका पॅनमध्ये २ ग्लास पाणी गरम करा आणि त्यात ही वाटलेली सामग्री घाला. आता मंद आचेवर शिजू द्या. पाणी निम्मे झाल्यावर गॅस बंद करून ते एका कपात गाळून घ्या आणि कोमट करून ते प्या. एकावेळी ते अर्धा किंवा एक ग्लास पिले जाऊ शकते.

कडुलिंबाचा काढा

काढा तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी
७-८ कडुलिंबाची पाने
४-५ तुळशीची पाने
२ काळी मिरी
अर्धा चमचा ओवा

तयार करण्याची पद्धत

७-८ कडुलिंबाची पाने, ४-५ तुळशीची पाने, २ काळी मिरी, अर्धा चमचा ओवा एकत्र बारीक करा. यानंतर एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घाला आणि त्यामध्ये या सर्व गोष्टी घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर ते गाळून एका ग्लासमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर प्या.

अश्वगंधाचा काढा बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

अश्वगंधा पावडर
मध
लिंबू

तयार करण्याची पद्धत

प्रथम एका पात्रात एक ग्लास पाणी घाला. आता त्यात एक चमचा अश्वगंधा पावडर घाला. आता हे पाणी किमान १० मिनिटे उकळू द्या. आता त्यात मध आणि लिंबाचा रस घाला. चवीनुसार या दोन्ही गोष्टी पाण्यात घाला. आता गॅस बंद करून काढा गाळून घ्या. आता काढा एकदम तयार आहे. तुम्ही हा काढा दररोज एक किंवा दोनदा पिऊ शकता.

तुळशीचा काढा बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

तुळशीची ८-१० पाने
हिरवी वेलची
काळी मिरी ३-४

तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घाला आणि मंद आचेवर ठेवा. आता त्यात तुळशीची ८-१० पाने, एक वेलची, काळी मिरी ३-४, आल्याचा तुकडा आणि १-२ मनुके घाला. यानंतर ते १५ मिनिटे उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या. थोडे कोमट झाल्यावर सकाळी किंवा रात्री झोपताना हलक्या प्या.

त्रिफळाचा काढा बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

२ चमचा त्रिफळा चूर्ण

तयार करण्याची पद्धत

सर्व प्रथम एका भांड्यात दोन ग्लास पाणी घाला आणि गॅसवर मंद आचेवर ठेवा. आता त्यात २ चमचा त्रिफळा चूर्ण घाला. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. अर्धे होताच गॅस बंद करा. नंतर ते गाळून घ्या. ते थोडे कोमट झाल्यावर प्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like