Ind Vs Aus : दुसऱ्या कसोटीमधून पृथ्वी, सहाला वगळले, भारतीय संघात 4 नवे चेहरे

मेलबर्न : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या कसोटीत लाजीरवाणी कामगिरी केल्यानंतर भारतीय संघावर टीका केली होती. पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर संघात बदल करण्यात आले आहेत.

पहिल्या कसोटीमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला (Pruthvi Shah) वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी शुभमन गिलचा (Shubhaman Gil) संघात समावेश करण्यात आला आहे. गिल भारताकडून कसोटीत पदार्पण करणार आहे. तर वृद्धीमान साहाच्या (Wriddhiman saha) ऐवजी ऋषभ पंतला (Rushabh pant) संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) याला देखील संघात स्थान देण्यात आले आहे. दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेलेल्या मोहम्मद शमीच्या जागेवर मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. सिराज देखील गिल प्रमाणे कसोटीत पदार्पण करणार आहे.

कर्णधार विराट कोहली मुलाच्या जन्मासाठी भारतात आला आहे. तर जलद गोलंदाज शमी दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरीत सामने खेळू शकणार नाही. दोन बदलांशिवया पृथ्वी शॉ आणि साहा यांना खराब कामगिरीमुळ संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी गिल आणि पंत यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. शमीची जागा सिराज घेणार आहे. याशिवाय रविंद्र जडेजाला संघात स्थान दिले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेटनी दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घातली आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्यापासुन मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.