IND Vs AUS : ‘या’ खेळाडूच्या फटकेबाजीनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दमवलं, सामना अनिर्णीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी केली. अजिंक्य राहणेचे (Ajinkya Rahane) शतक, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांचे अर्धशतक, उमेश यादवची गोलंदाजी ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब ठरली. सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व शुबमन गिल (Shubman Gill) यांना आपली छाप पाडता आली नाही. भारताने पहिला सराव सामना अनिर्णीत राखला.

अजिंक्य राहणेनं शतकी खेळी करत भारत अ संघाचा डाव सावरला. राहणेच्या नाबाद 117 धावांच्या जोरावर भारत अ संघाने 9 बाद 247 धावा करत डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचा निम्मा संघ 98 धावात माघारी परतला. मात्र, कॅमेरून ग्रीन आणि टीम पेन यांच्या दमदार खेळीने ऑस्ट्रेलिया अ संघाला कमबॅक करून दिले. ऑस्ट्रेलिया अ संघाने 9 बाद 306 धावांवर डाव घोषित केला.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना पुन्हा अपयश आले. पृथ्वी शॉ (19), शुबमन गिल (29), चेतेश्वर पुजारा (0) माघारी परतल्यानंतर हनुमा विहारी (28) आणि अजिंक्य राहणे (28) यांनी संघर्ष केला. भारताचे पाच फलंदाज केवळ 119 धावांत माघारी परतले. सराव सामन्यात भारताचा पराभव होणार हे निश्चित वाटत असताना पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या वृद्धीमान साहानं चांगली फटकेबाजी केली. त्याला इतर फलंदाजांची चांगली साथ मिळाली. साहानं 100 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 54 धावा करत संघाला 9 बाद 189 पर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलिया अ संघाला 15 षटकांत 131 धावा करायच्या होत्या. मात्र, त्यांना 1 बाद 52 धावा करता आल्या.