ऑस्ट्रेलियात लागलेल्या भीषण आगीत 5 कोटी प्राण्यांनी गमावला जीव, वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी (२०१९)  अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला आग लागल्याने प्रचंड परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलाला भीषण आग लागली आहे. ही आग आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. ही आग जवळपास ४ महिन्यांपासून धगधगत आहे. या आगीमुळे ऑस्ट्रेलियात प्रचंड नुकसान झाले असून देशात संकटाचे वातावरण आहे. यामुळेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी १३ जानेवारीपासूनचा ४ दिवसीय नियोजित दौरा रद्द केला आहे. यावर स्कॉट मॉरिसन यांनी प्रतिक्रिया दिली की, सध्या देशात वणवा भडकला असून अनेक लोक संकटात सापडले आहेत. त्या लोकांची सुखरूप सुटका करण्याकडे आमचे लक्ष असून या आगीतून काही लोकांची सुटका करण्यात आली आहे तर काही अजून आगीशी झुंज देत आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत सुमारे १८ लोकांचा तर जवळजवळ ५ कोटी प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्सच्या मध्य उत्तर भागात सर्वाधिका प्राणी आढळतात. आणि या भागात देखील आग लागली आहे. ही आग वेगाने किनाऱ्याकडे वेगाने पसरली आहे त्यामुळे आतापर्यंत सुमारे २०० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले असून अनेक लोक या आगीत सापडले आहेत.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली असून ऑस्ट्रेलियाची राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. या भागात जवळपास ७० लाख लोक वास्तव्य करतात. ही आग वेल्सपासून विक्टोरियापर्यंत पोहचली आहे. यामुळे अनेक लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. या आगीने जवळपास १.२३ कोटी एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं सांगितलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी ७४ हजार कर्मचारी काम करत आहेत.

https://twitter.com/tanjina_zaman/status/1213467737915215872

दरम्यान ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे. अ‍ॅमेझॉनप्रमाणे या जंगलात देखील वणवे पेटत असतात. या वर्षी ऑस्ट्रेलियाला प्रचंड दुष्काळाच्या झळा बसल्या असून ऊन आणि वेगाचा वारा यामुळे आग झपाट्याने पसरल्याचे वृत्त समोर आले आहे. हवामान विभागाने माहिती दिली की, ऑस्ट्रेलियाला जवळपास २०१७ पासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आणि यापुढेही या संकटाला सामोरे जावे लागेल असे ही हवामान विभागाने स्पपष्ट केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/