‘हे सगळं तुझ्यामुळेच घडलं’, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडचा युवराजवर आरोप

नवी दिल्ली : भारतीय संघाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो कॅनडामधील ग्लोबल टी २० या स्पर्धेत सहभागी झाला आहे. यावेळी त्याने त्याचा सहकारी अष्टपैलू बेन कटींग आणि त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर मुलाखतीत व्यस्त असताना मजेशीरपणे एक प्रश्न विचारला. त्यानंतर मात्र बेन कटींग ची प्रेयसी एरिन हिने युवराजवर आरोप केला आहे.

सामना सुरु होण्यापूर्वी एरिन हॉलंड ही बेन कटींगची मुलाखत घेत असताना युवराजने मध्येच येऊन त्यांना खट्याळपणे ‘लग्न कधी करणार?’ असा थेट प्रश्न केला आणि त्यानंतर लगेच तेथून निघून गेला. हा प्रश्न ऐकून कटिंग आणि हॉलंड यांची चांगली कोंडी झाली मात्र त्यांनंतर ते खळखळून हसताना दिसले. युवराजच्या प्रश्नावर एरिन हॉलंड हिने ‘युवराज, चिंता करू नकोस ; बेन आणि मी तुला लग्नाला नक्कीच बोलवू’, असे उत्तर दिले. ग्लोबल टी२० कॅनडाच्या ट्विटरवर शेअर झालेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हे सगळं तुझयामुळेच झालं :
ग्लोबल टी २० लीगच्या दुसऱ्या पात्रता फेरीत विनिपेग हॉक्स आणि ब्रॅम्प्टन वोल्व्ह यांच्यादरम्यान एक सामना सुरु होता त्यावेळी एका चाहत्याने आपल्या हातातील फलकावर एरिन आणि बेन यांच्यासाठी, ”ग्लोबल टी २० लीगची अंतिम फेरी उद्यापासून होणार आहे, मात्र तुम्ही लग्न कधी करणार?” असे लिहिले होते. हा फोटो शेअर करत हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय असा आरोप तिने युवराजवर केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like