कौतुकास्पद ! ऑस्ट्रेलियातील अग्नितांडवातून ‘या’ कुटूंबाने 90 हजार प्राण्यांना वाचवलं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या अग्नितांडवामुळे आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतलेला आहे. माणसांसोबत येथील वन्य जीवांना देखील मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा सोसाव्या लागल्याचे चित्र आहे. यामध्ये स्टीव्ह आयर्विन या वन्यप्रेमीच्या कुटुंबाने तब्बल ९० हजार प्राण्यांचा जीव वाचवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे सर्व प्राणी एकाच कुटुंबाने वाचवल्यामुळे अनेकांनी त्यांचे भरभरुन कौतुक केलं आहे.

ऑस्ट्रेलियातील आगीची तीव्रता इतकी जास्त होती की यात ५० कोटीपेक्षा अधिक मुक्या प्राण्यांचा जीव गेला. अनेक पर्यावरण प्रेमी आणि प्राणी प्रेमींनी देखील यावेळी मदत कार्यासाठी मोठी मदत केली. आयर्विन कुटुंबाकडून झु हॉस्पिटल चालविण्यात येतं. मागील १६ वर्ष या हॉस्पिटलने २४ तास प्राण्यांना सेवा पुरविली आहे

बिंदी आयर्विन सांगतात की, माझ्या पालकांनी आमची ऑस्ट्रेलिया प्राणिसंग्रहालय वन्यजीव रुग्णालय माझ्या सुंदर आजीला समर्पित केले. बिन्डी आयर्विन यांनी इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, वाइल्डलाइफ वॉरियर्स बनून आणि जितके शक्य असेल तितके जीव वाचवून आम्ही प्रयत्न करु.

स्टीव्ह आयर्विन हे वन्यजीवप्रेमी आणि प्राणिसंग्रहलायचे मुख्य होते. २००६ साली विषारी स्टींगरे माशाच्या चाव्यामुळे त्यांचा जीव गेला. मगर हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. आयर्विन कुटुंबाने त्यांची परंपरा पुढे कायम ठेवली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/