IND Vs AUS : भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियानं संघात केले बदल, 7 खेळाडूंना ‘डच्चू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांत तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. परंतू ऑस्ट्रेलिया भारताविरोधात खेळवण्यात येणाऱ्या सात खेळाडूंना डच्चू दिला आहे. इंग्लंड विरोध झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत खेळलेल्या 7 खेळाडूंना भारताविरोधात न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारतात दाखल होईल. वनडे सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ आज जाहीर केला. वर्ल्ड कप संघात असलेल्या मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंना निवड समितीने डच्चू दिला. तर कसोटी सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या मार्नस काबुशेन याला 14 जणांच्या संघात स्थान दिले आहे. जोश हेजलवुडचा पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या सामनात समावेश केला आहे.

भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व अ‍ॅरॉन फिंच करेल. तर पॅट कमिंस आणि अ‍ॅलेक्स कॅरी उपकर्णधार असतील. संघात पाच जलद गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. अ‍ॅडम जंपा आणि अ‍ॅश्टन अ‍ॅगर या फिरकीपटूंचा समावेश देखील संघात करण्यात आला आहे.

भारतीय दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघात फेरबदल करण्यात आला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत असलेल्या उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, नाथन कूल्टर नाईल, ग्लेन मॅक्सवेल, नाथन लायन आणि मार्कस स्टोयनिस या 7 जणांना डच्चू देण्यात आला आहे. तर भारत दौऱ्यावर जेसन बेहरनडॉर्फ जखमी असल्यामुळे येणार नाही.

ऑस्ट्रेलियाचा संघ –
1. अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार)
2. सीन अ‍ॅबॉट
3. अ‍ॅश्टन अ‍ॅगर
4. अ‍ॅलेक्स कॅरी
5. पॅट हॅट्सकॉम्ब
6. जोश हेजलवुड
7. मार्नस लाबुशेन
8. केन रिजर्डसन
9. स्टीव्ह स्मिथ
10. मिचेल स्टार्क
11. अ‍ॅश्टन टर्नर
12. डेव्हिड वॉर्नर
13. अ‍ॅडम जंपा

वनडे दौरा-
पहिली वनडे – 14 जानेवारी, मुंबई
दुसरी वनडे – 17 जानेवारी, राजकोट
तिसरी वनडे – 19 जानेवारी बेंगळुरु

मुख्य प्रशिक्षकाला विश्रांती –
भारतीय दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात मोठे बदल केले आहेत. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅगर यांना विश्रांती देण्यात आली आहे, त्यांच्या जागी अ‍ॅड्यू मेक्डॉनल्ड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/