आता एवढंचं बाकी राहिलं होतं ? ‘कोरोना’ व्हायरस होऊ नये म्हणून विमानात त्यानं केलं भलतंच काही (व्हिडीओ)

सिडनी : वृत्तसंस्था – कोरोना या भंकर व्हायरसमुळे संपूर्ण जगभरातील लोक हैराण झाले आहेत. या व्हायरसमुळे आत्तापर्यंत 2300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या प्रति मिनिट 3 ते 4 असून यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यााठी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. एकट्या चीनमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या व्हारसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एकाने स्वत:ला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घेतले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानातील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका प्रवाशाने कोरोनाव्हारसमुळं स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने चेहऱ्याला मास्क लावून हातात हातमोजे आणि प्लास्टिकचा हूड घातला आहे. हा व्हिडिओ अलिसा नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ अपलोड करताना अलिसाने लिहले आहे की, हे दोघे लोक माझ्या मागे विमानात बसले आहेत. कोरोनाव्हारसपासून घाबरून रहा. कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील अनेक लोकांच्या नोकऱ्या देखील धोक्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे भारताचे मोठे नुकसान
चीनमध्ये प्रचंड प्रमाणे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे एकट्या चीनमध्ये 2000 च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसमुळे चीनमधील अनेक उद्योग बंद असून याचा परिणाम थेट जागतीक बाजारपेठेवर होताना दिसत आहे. यातच महाराष्ट्रामध्ये चिकन खाल्यानं कोरोनाव्हायरस होतो अशी अफवा पसरल्याने महाराष्ट्राचे 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.