G – २0 परिषद : सेल्फी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान लिहीतात, ‘मोदी कितना अच्छा है’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या बुद्धीने आणि कर्तृत्तवाने भारतातच नाही तर सर्वत्र आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे. जो तो त्यांच्या कौतुकाचे पाढे वाचत असतो. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. जपानमधील ओसाका येथे जी-२० परिषद सुरु आहे. या परिषदेत मोदींची आणि मॉरिसन यांची भेट झाली. याबद्दल मॉरिसन यांनी आपल्या ट्विटरवर माहिती दिली. हे सांगताना मॉरिसन यांनी मोदींचे कौतुक चक्क हिंदीत केले आहे.

स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या ट्वीटरवर मोदी किती चांगले आहे! असं पोस्ट केले आहे. त्यासोबत दोघांचा एक सेल्फी शेअर केला आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी # जी २० ओसाकासमिट असे हॅशटॅग दिले आहे. मोदी कितना अच्छा है, हे त्यांनी लिहीलेले कॅप्शन चर्चेचा विषय बनत आहे.

सध्या मोदी जपानमधील ओसाका येथील जी – २० शिखर परिषदेत सहभागी झालेले आहेत. आज परिषदेचा दुसरा दिवस आहे. आज वातावरणाचा मुद्दा चर्चेचा विषय असणार आहे. सकाळी हवामान बदलावर एक बैठक होणार असून, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी जगातील इतर मोठ्या नेत्यांसह सहभागी होणार आहेत.

दरम्यान, परिषदेच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदींसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासारख्या जागतिक नेत्यांची द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी व्यापार, विकास आणि दहशतवाद याविषयावर चर्चा केली. यावेळी मोदींनी दहशतवादावार आपले मत व्यक्त केले. दहशतवाद हा जगासाठी एक धोका आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर त्यांनी जागतिक परिषद असावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

Loading...
You might also like