ऑस्ट्रेलिया सरकारच्या समोर Facebook ने टेकले गुडघे, पब्लिशर्सला मिळतील पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Facebook ने अलिकडेच ऑस्ट्रेलियात आपल्या प्लॅटफॉर्मवरून सर्व न्यूज लिंक्स ब्लॉक केल्या होत्या. फेसबुकने तेथील मीडिया बार्गेनिंग लॉ च्या अंतर्गत असे केले होते. तेथील सरकारचे म्हणणे होते की, फेसबुक आणि दुसर्‍या इंटरनेट कंपन्यांनी न्यूज पब्लिकेशनला त्यांच्या लिंक्सच्या बदल्यात काही पेमेंट करावे.

सुरुवातीला तर फेसबुकने यास स्पष्ट नकार दिला, परंतु आता ऑस्ट्रेलिया सरकारच्या समोर फेसबुक गुडघे टेकताना दिसत आहे. फेसबुकने तीन ऑस्ट्रेलियन मीडिया कंपन्यांशी अ‍ॅग्रीमेंटवर साइन केले आहे.

याच अ‍ॅग्रीमेंटवरून फेसबुकला आपल्या प्लॅटफॉर्मवर या मीडिया कंपन्यांच्या बातम्या दाखवण्यासाठी पेमेंट करावे लागेल. ही स्वाक्षरी फेसबुकने तेव्हा केली जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संसदेत हा कायदा मंजूर करण्यात आला आहे.

कायदा पास होताच फेसबुकने independent news organizations प्रायव्हेट मीडिया, Schwartz मीडिया आणि Solstice मीडियासोबत करार केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या न्यूजला आपल्या प्लॅटफॉर्मवर दाखवण्यासाठी फेसबुकला या मीडिया कंपन्यांना पेमेंट द्यावे लागेल.

सरकारचे म्हणणे होते की, फेसबुक न्यूज कंपन्यांच्या न्यूजद्वारे कमावलेला पैसा कंपन्यांसोबत शेयर करावा. फेसबुक यासाठी तयार नव्हते. आता बिल पास झाल्यानंतर फेसबुकने तीन ऑस्ट्रेलियन मीडिया ऑर्गेनायजेशनसोबत करार केला आहे. फेसबुकने म्हटले की, सध्या कमर्शियल अ‍ॅग्रीमेंट आहे. जो 60 दिवसांच्या आत फुल अ‍ॅग्रीमेंटप्रमाणे साइन केला जाईल.

यापूर्वी फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये न्यूज कंटेट दाखवणे बॅन केले होते. 6 दिवसापूर्वी लावलेला हा बॅन हटवण्यासाठी फेसबुक तयार झाले आहे. परंतु अजूनपर्यंत तो पूर्णपणे रिस्टोर करण्यात आलेला नाही. ज्यामुळे अजूनही अनेक न्यूज कंटेंट ऑस्ट्रेलियामध्ये दिसत नाही. या करारानंतर लवकरच आता सर्व न्यूज कंटेंट दिसू लागेल.