ऑस्ट्रेलियाने 15 मे पर्यंत भारतातून येणार्‍या फ्लाईट्सवर लावला प्रतिबंध, कोरोनामुळे घेतला निर्णय

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ऑस्ट्रेलियाने भारतातून येणार्‍या सर्व डायरेक्ट फ्लाईटवर 15 मेपर्यंत प्रतिबंध लावला आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी म्हटले की, भारतात प्रवास केल्यानंतर निर्माण होणारा धोका पाहता हा प्रतिबंध किमान 15 मे पर्यंत राहिल. काही दिवसांपूर्वीच ब्रिटन, ओमान, न्यूझीलँडसह जगभरातील अनेक देशांनी भारतात वाढणार्‍या कोरोनाच्या धोक्यामुळे फ्लाईट बंदी लागू केली आहे. यामुळे या देशांमध्ये राहणार्‍या मुळ भारतीय लोकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

स्कॉट मॉरिसन सरकारच्या या निर्णयाने भारतात राहणारे हजारो ऑस्ट्रेलियन नागरिक अडकले आहेत. यामध्ये आयपीएल खेळण्यासाठी आलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू सुद्धा आहेत. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या लढाईसाठी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. येत्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन सरकार ऑक्सीजन सप्लाय, पीपीई किट आणि व्हेंटिलेटर्स भारतासाठी पाठवणार आहे. देशाचे आरोग्य मंत्री ग्रेग हंट यांनी सोमवारी म्हटले की, कोरोनाचा धोका पाहता लवकरच भारताला तात्काळ मदत पॅकेज उपलब्ध केले जाईल. ऑस्ट्रेलियन सरकार भारताला सर्वोतोपरी मदत करेल.

भारताने 28 देशांसोबत केला एयर बबल करार
भारतात वाढणार्‍या कोरोना प्रकरणांमुळे हाँगकाँग, ओमान, ब्रिटन, औदी अरब, न्यूझीलँड सारख्या देशांनी विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. यामुळे लोकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे, भारताने जगातील 28 देशांसोबत एयर बबल करार केला आहे. या करारात सर्वात नवीन करार श्रीलंकेशी करण्यात आला आहे. ज्या देशांसोबत एयर बबल करार झाला आहे, त्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, बहरीन, इथियोपिया, जपान, केनिया, कुवैत सारख्या देशांचा समावेश आहे.