AUS vs IND : रहाणेच्या कॅप्टनसीची फॅन झाली ईशा गुहा, जाणून घ्या काय म्हणाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (australia vs india) खेळली जात असलेली बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरीज सध्या रोमांचक वळणावर पोहचली आहे. अ‍ॅडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमला 8 विकेटने दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता, ज्यानंतर मेलबर्नमध्ये भारतीय टीमने (Indian team ) जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियन टीमला 8 विकेटने पराभूत केले. भारतीय कॅप्टन विराट कोहली (Indian captain Virat Kohli) भारतात परतल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंना वाटले होते की, भारतीय टीम चांगली कामगिरी करणे अवघडच नसून अशक्य आहे.

तर भारतीय कॅप्टन विराट कोहलीच्या गैरहजेरीत काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेने उत्तम कामगिरी केली आणि चांगली कॅप्टन्सी करत भारतीय टीमला 8 विकेटने विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीबाबत इंग्लंडची माजी महिला खेळाडू आणि क्रिकेट कॉमेंटेटर ईशा गुहाने अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीचे कौतूक करताना म्हटले की, विराट कोहली आणि मोहम्मद शमी सारख्या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत त्याने चांगला खेळ दाखवला आणि टीमची एकजुट राखण्यात यशस्वी ठरला आहे.

ईशा गुहाने रहाणेच्या कॅप्टन्सी बाबत स्पोर्ट्स टुडेला सांगितले की, अ‍ॅडलेडमध्ये ज्याप्रकारे भारतीय टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर टीमला एकत्र ठेवण्याचे काम केवळ रहाणेच करू शकत होता. कोहली-शमीच्या गैरहजेरीत त्याने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे ती कौतूकास पात्र आहे. रहाणे आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू आहे, त्याला अगोदरही यश मिळाले आहे परंतु त्यावेळी त्याचा वैयक्तिक खेळ काही खास नव्हता, परंतु मेलबर्नमध्ये त्याने जे केले ते उत्तम होते. त्याचा हा डाव डिसिप्लिन्ड होता, त्याने खराब चेंडूंवर शॉट खेळले आणि चांगल्या चेंडूंना सन्मान दिला.

तिने म्हटले, मेलबर्नमध्ये जेव्हा रहाणे खेळत होता, तेव्हा तो आपला डावादरम्यान अनेकदा झुंझताना दिसला होता, परंतु जेव्हा त्याला संधी मिळत असे तेव्हा तो शॉट लगावण्यास चुकत नव्हता. विराट कोहली आपल्या पद्धतीने टीमची सूत्र सांभाळत होता. परंतु रहाणेची पद्धत वेगळी आहे आणि तो टीमला बांधून ठेवण्याचे काम करतो, अशावेळी जर तुम्हाला ऑस्ट्रेलियन टीमला पराभूत करायचे आहे तर एक टीम म्हणून खेळणे आवश्यक आहे. दोन टीमध्ये खेळवली जात असलेली ही टेस्ट सीरीज 1-1 ने बरोबरीत आहे, तर सीरीजची तिसरी टेस्ट मॅच 7 जानेवारीपासून सिडनीत खेळली जाणार आहे.