जगातील सर्वात HOT महिला क्रिकेटपटूचा ऐतिहासिक विक्रम ! कपिल देव , वॉटसनला टाकलं मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाची अ‍ॅलिस पॅरी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाते. जगातील सौंदर्यावती खेळांडूबाबत बोलायचे झाले तर, अ‍ॅलिस पॅरी अग्र क्रमावर आहे. आपल्या सौंदर्यांने तिनं सर्वांना घायाळ तर केलंच आहे. परंतु ती उत्तम खेळाडू आहे. अ‍ॅलिसनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कपिल देव, वॉटसन यांनाही अ‍ॅलिसनं नुकतंच मागे टाकलं आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावा करणारी आणि 150 विकेट घेणारी अ‍ॅलिस पॅरी पहिली खेळाडू ठरली आहे. अ‍ॅलिसनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अ‍ॅलिसचा आपल्या करिअरचा हा 150वा सामना होता. या 150व्या सामन्यात तिने ही महत्त्वाची कामगिरी केली आहे. ही कामगिरी करत अ‍ॅलिसनं अनेक दिग्गजांना पिछाडीवर टाकलं आहे.

मुख्य बाब अशी की, एक नवा रेकॉर्ड करत अ‍ॅलिसनं कपिल देव, वॉटसन यांना मागे टाकलं आहे. बांग्लादेशचा आलराऊंडर खेळाडू शाकिब अल हसननं 119 सामन्यात ही कामगिरी केली होती.

अ‍ॅलिससाठी गर्वाची बाब ही की, अशा प्रकारे 150 विकेट आणि 3 हजार धावा करणारी अॅलिस पॅरी ही पहिली महिला ऑलराऊंडर खेळाडू ठरली आहे. सर्व स्तरातून अॅलिसचं कौतुक होताना दिसत आहे.

 

Visit : Policenama.com