…म्हणून ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांचा ‘बळी’ घेतला जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिणेकडील ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याअभावी 10,000 वन्य उंटांना ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची बचत व्हावी या उद्देशाने दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये वन्य उंटांचा बळी घेतला जाणार आहे. हेलिकॉप्टरमध्ये व्यावसायिक नेमबाजांकडून 10,000 हून अधिक उंट मारले जातील. हे उंट ग्लोबल वार्मिंगमध्ये भयंकर योगदान देतात, कारण 1 दशलक्ष उंट वर्षातून एक टन कार्बन डाय ऑक्साईडच्या बरोबर मिथेन उत्सर्जित करतात. जे 4 दशलक्ष कारच्या बरोबरीने आहे.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलातून आग पसरत आहे आणि पाण्याअभावी त्यावर नियंत्रण आले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांनी उंटांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनंगू पिंजंतजतजारा यंकुनितजतजारा जमीनवरील (एपीवाय) आदिवासी नेत्यांच्या आदेशानंतर व्यावसायिक नेमबाज बुधवारीपासून हेलिकॉप्टरमधून 10,000 उंट मारतील. पाण्याच्या शोधासाठी प्राण्यांवर हल्ला झाल्याची स्थानिक समुदाय तक्रार करत आहेत.

एपीवाय कार्यकारी मंडळाच्या सदस्य मारिता बेकर यांनी सांगितले कि , आम्हाला उष्ण आणि अस्वस्थ परिस्थितीत जगण्यास भाग पाडले जात आहे. उंट आत येऊन कुंपण तोडत असल्याने आम्हाला अस्वस्थ वाटते आहे. ते घरात खाण्या -पिण्यासाठी शोधत फिरत आहेत आणि एअर कंडिशनरद्वारे पाणी पिण्याचा प्रयत्न करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/