ऑस्ट्रेलियन कोच म्हणतायेत क्रिकेटमध्ये दुजाभाव ; कोहलीच्या कृतीवर घेतला आक्षेप

ॲडलेड : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरु आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर आमच्या खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहलीसारखा जल्लोष केला असता तर, ‘जगातील सर्वात वाईट माणसं’ म्हणत त्यांच्यावर टीका झाली असती, असं सांंगून ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक जस्टिन लँगर यानं कोहलीच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला केवळ २३५ धाव करता आल्या. भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. ट्रेव्हिस हेडच्या ७२ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला किमान २०० धावांचा टप्पा तरी गाठता आला,  भारताने पाहल्या डावात १५ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली.या डावात सलामीवीर फिंच बाद झाल्यावर विराटने जे सेलिब्रेशन केले, ते ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना आवडले नाही.

या बाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले की अशा पद्धतीचे सेलिब्रेशन जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केले असते, तर संपूर्ण क्रिकेट जगताने त्यावर लगेच टीका केली असती. आनंद साजरा करत सेलिब्रेशन करणे आणि समोरच्या खेळाडूला हिणवणे यात अतिशय थोडे अंतर असते. विराटमध्ये क्रिकेटचे वेड आहे. पण त्याबरोबरच मैदानावरील सभ्यताही तितकीच महत्वाची असते, असे ते म्हणाले.

भारतीय खेळाडूंकडे कसोटी सामन्यांचा अधिक अनुभव होता. अनुभवाच्या जोरावर हे खेळाडू खेळत होते. सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ कमी अनुभवी आहे. त्यामुळे सध्याच्या संघाबाबत सयंम बाळगला पाहिजे. तसेच ते म्हणाले,की चेंडू कुरतडल्या प्रकरणानंतर सध्याच्या संघावर सर्वांची करडी नजर आहे. तर दुसरीकडे विराट विकेट पडल्यावर आक्रमक शैलीत सेलिब्रेशन करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या परिस्थीतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विराट सारखे सेलिब्रेशन केले असते तर सर्वात बाद संघ म्हणून त्याची हेटाळणी झाली असती.’

मैदानात कोहलीचा बॉलिवूड स्टाईल डान्स –

दरम्यान  सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा विराट कोहली हा चांगलाच चर्चेत राहीला. कारण तिसऱ्या दिवशी विराटवर टीका झाली, त्याने माफी मागितली, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर त्याच्या हजार धावा पूर्ण झाल्या, पण विराट अजून एका गोष्टीसाठी शनिवारी चर्चेत राहीला. शनिवारी विराटने मैदानात बॉलिवूड स्टाइलमध्ये डान्स केला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावाच्यावेळी विराट क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी विराटने झकास डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.