Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली टीम इंडियाची ‘माफी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सिडनी कसोटीत (Test Match) तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीच्या खेळात घडलेल्या प्रकारामुळे मात्र थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भारतीय खेळाडूंची माफी मागावी लागली आहे. सामन्यात चाहत्यांकडून भारतीय खेळाडूवर झालेल्या वर्षभेदी टीकेचाआम्ही जाहीर निषेध करतो, असे म्हणत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाची बिनशर्त माफी मागितली आहे. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास करुन दोषीर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतर चौथ्या दिवशीही चालू क्रिकेट सामन्यात काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केली. सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना हा प्रकार घडला. त्याने सुरूवातीला दुर्लक्ष केले. पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नाही, हे पाहिल्यानंतर त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता.

भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आले. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसल्याने साऱ्यांनी टीम इंडियाचं कौतुक केले आहे.