IND vs AUS : टीम इंडियाविरुद्ध विशेष ‘जर्सी’मध्ये उतरणार ऑस्ट्रेलियन टीम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियातील स्थानिक रहिवाशांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत विरुद्ध आगामी टी-20 मालिकेत खास डिझाइन केलेली स्वदेशी जर्सी परिधान करतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी डिझाइनचे अनावरण केले, ज्याची निर्मिती अ‍ॅसिक्स आणि दोन स्वदेशी महिला आंटी फिओना क्लार्क आणि कर्टनी हाजेन यांनी केली आहे.

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने सांगितले की, ‘क्लार्क दिवंगत क्रिकेटर ‘मास्किटो’ कजेंसच्या वंशज आहेत, जे 1868 मध्ये इंग्लंडचा दौरा करणारे टीममध्ये स्वदेशी खेळाडू होते.’ ही डिझाइन स्थानिक माजी, विद्यमान आणि भविष्यातील स्वदेशी खेळाडूंना समर्पित आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघानेही या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अशी जर्सी परिधान केली होती.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने म्हटले की, ‘या प्रकारची जर्सी घालण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे.’ भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 27 नोव्हेंबरला तीन एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यासोबत सिडनी येथे सुरू होईल. यानंतर तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळले जातील.