ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिलाच निकाल ‘धक्कादायक’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आतापर्यंत 7 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा तिसऱ्या फेरीत पराभव झाला आहे. या स्पर्धेतील ही धक्कादायक विजयाची नोंद आहे. चीनच्या वांग कियांगनं सेरेनावर विजय मिळवत तिचा पराभव केला आहे. वांग कियांगंच वय 28 वर्षे आहे.

कियांगनं तिसऱ्या फेरीत सेरेनाचा 6 – 4, 7 – 6(2 – 7), 7 – 5 असा पराभव केला आहे. तब्बल 23 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या सेरेनावर कियांगनं विजय मिळवला आहे. जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असणाऱ्या कियांगनं 2 तास 40 मिनिटांत हा सामना जिंकला आहे. यानंतर आता कियांगला पुढील फेरीत स्थान मिळालं आहे.

असा झाला कियांगचा विजय
सेरेनाविरुद्धच्या सामन्यात कियांगनं पहिल्या सेटमध्ये विजय मिळवला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये मात्र सेरेनानं चांगली लढत दिली आणि सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये कियांगनं शानदार खेळी करत 7-5 नं विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कियांगच्या विजयाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –