Australian Open 2023 | ग्रँडस्लॅमसह निवृत्ती घेण्याचे सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

पोलीसनामा ऑनलाईन : ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open 2023) मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा या जोडीला पराभव स्वीकारावा लागला आहे. ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी-राफेल मॅटोस या जोडीने सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा यांचा 7-6,6-2 अशा फरकाने पराभव केला आहे. या अगोदर सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा या जोडीने सेमी फायनलमध्ये डेसिरे क्रॉझिक आणि नील स्कुप्स्की या जोडीचा पराभव करत अंतिम फेरीत (Australian Open 2023) धडक मारली होती.

या पराभवानंतर ग्रँडस्लॅमसह निवृत्ती घेण्याचं सानिया मिर्झाचं स्वप्नसुद्धा भंगले. आपल्या कारकिर्दीमधील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असलेल्या सानिया मिर्झाने याअगोदर तीन महिला दुहेरी ग्रँडस्लॅम आणि तीन मिश्र दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहेत. सानिया मिर्झाने वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजेच 2005 मध्ये मेलबर्नमधून सुरूवात केली होती. सानिया आपल्या शेवटच्या सामन्यानंतर भावुक झाली होती. सानिया मिर्झाने निवृत्तीनंतर दुबईमध्ये असलेल्या तिच्या टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रित करणार आहे. सानियाने आपल्या कारकिर्दीत महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तसेच 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.

काही दिवसांपासून सानिया मिर्झा आपल्या वैवाहिक जीवनामुळे खूप चर्चेत आहे.
सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरात सुरू आहे.
काही दिवसात ते घटस्फोटदेखील घेणार आहेत. हे दोघे वेगळे होण्यामागचे कारण पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर असल्याची चर्चा सुरु आहे.
आयेशा आणि शोएबने काही बोल्ड फोटोशूट केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते.
मात्र आयेशाने यावर मौन सोडत एका मुलाखतीत हे फोटोशूट एका जाहिरातीसाठी करण्यात आल्याचे उघड केले होते.

Web Title :- Australian Open 2023 | brazils stefani matos beat sania bopanna in australian open 2023 mixed doubles final

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Pune Crime News | ‘तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ, जर्मनीत राहणाऱ्या पतीविरोधात पुण्यात FIR