Australian Open | जोकोविचने 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावून राफेल नादालच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Australian Open | नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद नोवाक जोकोविचने जिंकले आहे. अंतिम सामन्यातील पहिले दोन्ही सेट जोकोविचने जिंकले होते. त्यानतंर तिसऱ्या स्टेमध्ये त्सितीपासने जोकोविचला चांगली झुंज दिली. तिसरा सेट बरोबरीत राहिल्यानतंर या सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर लागला. जोकोविचने या विजेतेपदासह राफेल नदालच्या 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बरोबरी केली आहे. (Australian Open)

 

कसा झाला सामना?
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचला त्सितिपासने चांगली झुंज दिली. जोकोविचने पहिला सेट 6-3 असा जिंकला होता. त्यानतंर त्सितीपासने त्याला जोरदार टक्कर दिली, मात्र दुसरा सेटदेखील जोकोविचने 7-6 असा जिंकला. यानंतर तिसरा सेट बरोबरीत सुटला. यानंतर या सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर लागला. जोकोविचने टायब्रेकरवर 7-6 अशा फरकाने मात करत विजेतेपद आपल्या नावावर केले. जवळपास तीन तास हा अंतिम सामना खेळवण्यात आला. (Australian Open)

 

या विजयासह जोकोविचने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. तसेच त्याने या बरोबर राफेल नादालच्या 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बरोबरी केली. तसेच त्याने पुन्हा एकदा एटीपी रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. मागच्या जून महिन्यात कार्लोस अल्कारेझने जोकोविचला मागे टाकत पहिले स्थान पटकावले होते. जोकोविचने आतापर्यंत दहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे आणि विशेष म्हणजे दहाही वेळा त्याने विजेतेपद पटकावले आहे.

 

Web Title :-  Australian Open | australian open 2023 final novak djokovic won against stefanos tsitsipas on tie breaker

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण