भावाला OUT करण्याच्या प्रयत्नात आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू झाला ‘रक्तबंबाळ’ (व्हिडिओ)

कॅनबेरा : वृत्तसंस्था – मार्श कपसाठी पश्चिम ऑस्ट्रेलिया व दक्षिण ऑस्ट्रेलिया टीमच्या दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामने सुरु आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅश्टन एगर हा जखमी झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्याच भावाने वेस एगरने मारलेल्या चेंडूचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ही दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलिकडून 9 एकदिवसीय आणि 4 कसोटी सामन्यात अ‍ॅश्टन खेळला आहे. मात्र त्याचा भाऊ वेसला राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही.

सामना सुरु असताना वेस एगरने मारलेला चेंडू झेलण्याचा अ‍ॅश्टनने प्रयत्न केला. मात्र तो चेंडू जोरात त्याच्या डोळ्याजवळ लागल्याने जखम झाली व रक्तस्राव सुरु झाला. अ‍ॅश्टन जखमी होताच लहान भाऊ वेस धावत त्याच्याजवळ पोहचला. डॉक्टरांनी मैदानावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला न खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो या सामन्यातून बाहेर झाला. हा सामना अ‍ॅश्टनच्या संघाने म्हणजेच पश्चिम ऑस्ट्रेलियानं 6 धावांनी जिंकला.

Visit : Policenama.com