Australian Test Team Captain | 65 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ फास्ट बॉलर बनला टेस्ट टीमचा कॅप्टन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Australian Test Team Captain | काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन टीम पेन (Tim Paine) याने अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्या प्रकरणी आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आगामी अ‍ॅशेस सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन (Australian Test Team Captain) कोण होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आज अखेर पेनच्या जागी ऑस्ट्रेलियानं फास्ट बॉलर पॅट कमिन्सची (Pat Cummins) कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे.

 

 

 

कमिन्स यापूर्वी ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन होता. पेनचा उत्तराधिकारी म्हणून त्याचं नाव सर्वात आघाडीवर होतं. अखेर आज पॅट कमिन्सच्या नावावर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) शिक्कामोर्तब केले आहे. कमिन्सच्या रुपाने 1956 नंतर म्हणजे तब्बल 65 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला फास्ट बॉलर टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून मिळाला आहे. तर टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) नियुक्ती करण्यात आली आहे.

 

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिली टेस्ट 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
पॅट कमिन्सपुढे ही प्रतिष्ठेची सीरिज जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
2017 साली ऑस्ट्रेलियन टीममध्ये परतल्यानंतर कमिन्सच्या खेळात मोठी सुधारणा झाली आहे.
टेस्ट प्रमाणेच वन-डे आणि टी20 टीममध्ये पॅट कमिन्स (Pat Cummins) टीमचा मुख्य सदस्य आहे.

 

Web Title :- Australian Test Team Captain | pat cummins confirmed as australia s new test captain and steve smith named vice captain ahead of ashes series

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा