AUS Vs PAK : पाकिस्तानच्या ‘कॅप्टन’नं मैदानातच सहकार्‍याची केली ‘हेटाई’, चांगलच ‘झापलं’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रलिया आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा टी-20 सामना सध्या कॅनबेरामध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात सध्या ऑस्टेलिया मजबूत स्थितीत असून पाकिस्तानचा निम्मा संघ 106 धावांत परतला असून कर्णधार बाबर आझम एका बाजूने आपली बाजू सक्षमपणे सांभाळून उभा आहे. मात्र सहकारी एका बाजूने बॅड होत असताना त्याचा देखील पारा वाढलेला या सामन्यात पाहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फखर जमान आणि हॅरिस सोहेल हे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर बाबर आझम याने रिझवान याच्याबरोबर काही काळ संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने देखील निराशा केली. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावल्याने बाबर संतापला.असिफ अली बॅड झाल्यानंतर तो ज्या पद्धतीने बॅड झाला ते पाहून बाबर आझम मोठ्या प्रमाणात संतापला. त्यामुळे त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकात 6 बाद 150 धावा केल्या असून ऑस्ट्रेलियाला ते किती धावांवर रोखतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच पहिला टी-20 सामना पावसात वाहून गेल्याने या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाच्या दिशेने जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like