रिक्षा चालकाचा असाही प्रामाणिकपणा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कामाच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी प्रत्येकजण बस वाट न पाहता रिक्षाने जाणे पसंत करतात. मात्र, घाईगडबडीत आपली बॅग रिक्षामध्ये विसरून निघून जातात. विसरलेली बॅग काही रिक्षा चालक प्रामाणीकपणे परत करतात. तर काही रिक्षा चालक आपल्या गाडीत अशा प्रकारची बॅग विसरली नसल्याचा आव आणून प्रवाशांची बॅग ढापतात. अशा रिक्षा चालकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांकडे देखील संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. परंतु प्रामाणीक रिक्षा चालकांमुळे काही अंशी का होईना प्रवाशांमध्ये त्यांच्याविषयी आदर आहे.

असाच एक प्रकार आज पुण्यामध्ये घडला. रिक्षामध्ये विसरलेली प्रवाशाची बॅग रिक्षा चालकाने प्रामाणीकपणे परत केली. या बॅगेमध्ये चार लाखाचे बेरर चेक होते. रिक्षा चालकाने मनात आणले असते तर त्याने ते पैसे काढून देखील घेतले असते. मात्र, या रिक्षा चालकाने प्रमाणिकपणे बॅग परत करुन इतर रिक्षा चालकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

पुण्यासारख्या शहरामध्ये मोट्या प्रमाणात रिक्षाने प्रवास करणारे नागरिक आहेत.  त्यामध्ये लहान मुलानं पासून तर मोठ्या पर्यंत सगळेच दिसून येतात.  रिक्षाने प्रवास करताना मौल्यवान वस्तू आपल्या बरोबर घेऊन फिरतात. आणि गडबडी मध्ये त्या वस्तू रिक्षामध्ये विसरून जातात आणि त्या परत मिळत देखील नाही. अश्या घटना या आधी देखील घडल्या आहेत.

अशीच एक घटना पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी घडली आहे. रिक्षा मध्ये प्रवास करताना त्यात अगोदरच्या प्रवाशाची बॅग विसरली असल्याचे लक्षात आले. त्यावर अविनाश भोकरे यांनी ही बॅग सकाळच्या वेळी प्रभात पोलीस चौकीत आणून दिली. पोलीस शिपाई शेखर कौंटकर आणि मोहन मलगुंडे यांनी बॅग ताब्यात घेऊन बॅग मालकाचा शोध सुरु केला.

पोलिसांनी अविनाश भोकरे यांच्याकडे चौकशी केली असता ही बॅग आधीच्या प्रवाशाची असून ती रिक्षात विसरली होती. त्यानंतर शेखर कौंटकर यांनी बॅग उघडून पाहिल्यावर त्यात डायरी व ४ लाख रुपयांचा बेरर चेक आढळून आला़. डायरी पहिल्या नंतर त्यातून मिलिंद पटेल यांचा मोबाईल नंबर मिळाला, त्यांना संपर्क करून पोलिसांनी बॅगेची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांचा मित्र युवराज माने यांची ही बॅग असल्याचे समोर आले. मी हि बॅग रिक्षात विसरलो होतो, असे युवराज माने याने सांगितले. त्या नंतर पोलिसांनी माने यांना प्रभात पोलीस चौकीत बोलून घेतले. युवराज माने याच्याकडे चौकशी दरम्यान पोलिसांची खात्री पटल्यानंतर त्यांनी ही बॅग युवराज माने याच्य स्वाधीन केली. हरवलेली बॅग परत मिळाल्याने माने याने पोलीस आणि रिक्षा चालकाचे आभार मानले.