काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांसाठी आता ‘हा’ ड्रेसकोड ‘बंधनकारक’, अन्यथा ‘नो-एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसी काशी विश्वनाथ मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या धर्तीवर आता या ठिकाणी देखील दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवास स्पर्श करण्या अगोदर, पुरूषांना धोतर-कुर्ता व महिलांना साडी नेसावी लागणार आहे.

मंदिर व्यवस्थापनानं घेतलेल्या निर्णयानुसार, आता जीन्स, पॅंट, टी-शर्ट आणि सूट परिधान केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे, पण भाविकांना काशी विश्वनाथास स्पर्श करून दर्शन करण्याची परवानगी नसणार आहे. रविवारी मंदिर प्रशासनाच्या झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठक धर्मार्थ कार्यमंत्री डॉ. नीळकंठ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनासाठी ड्रेसकोड लागू करण्याच्या निर्णयासह गाभाऱ्यात जाऊन देवाच्या स्पर्श दर्शनाची वेळही वाढवण्यात आली आहे. मंदिरात स्पर्श दर्शनासाठी रोज एका तासाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मकर संक्रांतीनंतर या वेळेत वाढ करून ती सात तास करण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/