टेक्नोलाॅजी

देशात सर्वाधिक विकल्या जातात ‘या’ 10 गाड्या, त्यापैकी मारूतीच्या ‘8, इथं पाहा यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याच काळापासून वाहन निर्मिती क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. 2019 मध्ये वाहन निर्मिती क्षेत्राचे प्रदर्शन आवश्यक तितके चांगले राहिले नाही. परंतु वर्ष संपताच या क्षेत्रात सुधार आला आहे. डिसेंबर 2019 मध्ये गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. विक्री वाढण्याचे सर्वात मोठे श्रेय देशातील वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीला दिले जात आहे, कारण मारुतीच्या गाड्यांची मोठी विक्री झाली.

डिसेंबरमध्ये देशात सर्वात जास्त विकल्या गेलेल्या 10 गाड्यांपैकी 8 गाड्या मारुतीच्या आहेत. तर दोन गाड्या ह्युंडाईच्या आहेत.

सर्वात जास्त विक्री झालेल्या मारुतीच्या गाड्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे प्रीमीयम हॅचबॅक बलेनो. डिसेंबर 2019 मध्ये कंपनीच्या बलेनोची 18,464 यूनिट्सची विक्री झाली. तर डिसेंबर 2018 मध्ये बलेनोच्या 11,135 यूनिट्सची विक्री झाली होती. दुसऱ्या क्रमांकावर आहे एंट्री लेवल कार ऑल्टो (15,489 यूनिट्स), तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिझायर (15,286 यूनिट्स), तर ह्युंडाईच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही वेन्यू आणि प्रीमियम हॅटबॅक कार एलीट आय 20 यांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे.

डिसेंबर 2019 मध्ये सर्वात जास्त विक्री झालेल्या गाड्या –

1. Maruti Baleno – 18,464 यूनिट्स
2. Maruti Alto – 15,489 यूनिट्स
3. Maruti Dzire – 15,286 यूनिट्स
4. Maruti Swift – 14,749 यूनिट्स
5. Maruti Vitara Brezza – 13,658 यूनिट्स
6. Maruti WagonR – 10,781 यूनिट्स
7. Hyundai Venue – 9,521 यूनिट्स
8. Maruti S-Presso – 8,394 यूनिट्स
9. Hyundai Elite i20 – 7,740 यूनिट्स
10. Maruti Eeco – 7,634 यूनिट्स

Back to top button