जगातील सर्वात वाईट वाहतूक कोंडी बंगळूरूमध्ये, टॉप 10 मध्ये भारतातील पुण्यासह 4 शहरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज वाहतूकीची समस्या ही अत्यंत भयानक समस्या झाली आहे. यावर उपाय योजना कितीही केल्या तरी परिणाम मिळत नसल्याचे भारतात दिसून येते. भारतासह देशभरात वाहतूक कोंडीची समस्या आहेच. वाहनांची संख्या वाढत चालल्या आहेत. परंतु वाहतूक कोंडीबाबत आता जगभरातील शहरांना भारताने मागे टाकले आहे.

आपल्या देशात अमेरिका आणि चीन पेक्षा कमी कार रस्त्यावर आहे परंतु वाहतूक कोंडीबाबत आपण पुढे आहोत. ‘TomTom’ या वाहन नेव्हिगेशन कंपनीने एन्युअल ट्रॅफिक इंडेक्स जाहीर केला आहे. जगातील 10 सर्वात आधिक वाहतूक असलेल्या शहरात भारतातील चार शहरांचा समावेश आहे. यातील टॉप 10 मध्येच बंंगळुरु पहिल्या स्थानी आहे. यात 57 देश आणि 6 महाद्विपांवरील 416 शहरांचे सर्वेक्षण केले आहे. ज्या जगभरात होणाऱ्या ट्राफिक जामच्या प्रकरणी कोणते शहर कोणत्या क्रमांकावर आहे याची यादी जाहीर झाली आहे.

टॉमटॉमच्या माहितीनुसार, वाहतूक कोंडीची सर्वात जास्त परिणाम भारतावर होतो. जगातील ज्या 10 शहरात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते, त्यात भारताच्या चार शहरांचा समावेश आहे. ज्यात बंगळुरु, दिल्ली, पुणे आणि मुंबईचा समावेश आहे. भारताचे आयटी हब असलेल्या बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार 20 ऑगस्ट 2019 वाहतूक कोंडीसाठी अत्यंत गंभीर दिवस होता. या दिवशी 103 टक्के कन्जेशन (वाहतूक कोंडी) होती. 6 एप्रिल 2020 ला 30 टक्के वाहतूक कोंडी होती. हा दिवस या वर्षातील सुरुवातीचा सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा दिवस होता.

टॉप 10 वाहतूक कोंडी होणारी शहर –
1. बंगळुरू (भारत) – 71 टक्के
2. मनीला (फिलीपींस) – 71 टक्के
3. बोगोटा (कोलंबिया) – 68 टक्के
4. मुंबई (भारत) – 65 टक्के
5. पुणे (भारत) – 59 टक्के
6. मास्को ओब्लास्ट (रशिया) – 59 टक्के
7. लीमा (पेरु) – 57 टक्के
8. नवी दिल्ली (भारत) – 59 टक्के
9. इस्तांबुल (तर्की) – 55 टक्के
10. जकार्ता (इंडोनेशिया) – 53 टक्के

फेसबुक पेज लाईक करा