Auto Debit Cheque Book Pension Rules | 5 दिवसानंतर बदलतील ‘हे’ 6 नियम, पेमेंट आणि चेकबुक संबंधित नियमामुळे सॅलरीसह इतर गोष्टींवर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Auto Debit-Cheque Book-Pension Rules | पाच दिवसानंतर म्हणजे 1 ऑक्टोबरपासून अनेक नवीन बदल (changes from 1 October 2021) दिसून येतील. होय… सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी केवळ 5 दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यास सुरूवात होईल. ऑक्टोबरची सुरूवात होण्यासह तुमच्या बँक आणि सॅलरीसंबंधी नियमात बदल (Auto Debit-Cheque Book-Pension Rules) होणार आहेत.

पुढील महिन्यापासून दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी (important rules changes from 1st October) बदलणार आहेत.
या बदलांचा संबंध सर्व लोकांच्या जीवनाशी आहे. यामध्ये बँकिंग नियमापासून (Bank rules) LPG सह (LPG price) अनेक बदलांचा समावेश आहे.
कोण-कोणत्या नियमात बदल होणार आहेत ते जाणून (Auto Debit-Cheque Book-Pension Rules) घेवूयात…

1. पेन्शन नियमात होणार बदल (Pension rules)

ऑक्टोबरपासून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (Digital life certificate) संबंधी नियम बदलणार आहे.
आता देशातील सर्व ज्येष्ठ पेन्शनर्स ज्यांचे वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते देशातील सर्व हेड पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रमाण सेंटरमध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतील.

यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला आहे. जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचे काम पोस्ट ऑफिसद्वारे सुरू होत आहे.
यासाठी भारतीय पोस्ट विभागाने सर्व पोस्ट कार्यालयांना जीवन प्रमाण सेंटरचा आयडी वेळेवर अ‍ॅक्टिव्ह करण्यास सांगितले आहे.

 

2. 1 ऑक्टोबरपासून चालणार नाही जुने चेकबुक (Cheque book rules)

ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि MICR कोड इनव्हॅलिड होतील. या बँका आहेत – ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India)
आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank). या बँका त्या आहेत ज्यांचे अलिकडेच इतर बँकांमध्ये विलिनिकरण झाले आहे.

या बँकांचे विलिनिकरण झाल्याने अकाऊंट हॉल्डरचे अकाऊंअ नंबर, आयएफएससी व एमआयसीआर कोडमध्ये बदल झाल्याने 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग सिस्टम जुने चेक रिजेक्ट करणार आहे.
या बँकांचे सर्व चेकबुक आमान्य होतील.

3. ऑटो डेबिट कार्डचे बदलणार नियम (auto debit rules)

ऑक्टोबरपासून तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे होणार्‍या ऑटो डेबिटसाठी RBI (Reserve Bank of India) चा नवीन नियम लागू होत आहे.
या अंतर्गत डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा मोबाइल वॉलेटमधून होणारे काही ऑटो डेबिट तोपर्यंत होणार नाहीत, जोपर्यंत ग्राहक आपली मंजूरी देणार नाही.

ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार्‍या नवीन Additional Factor Authentication नियमानुसार बँकेला कोणत्याही ऑटो डेबिट पेमेंटद्वारे अकाऊंटमधून पैसे डेबिट करण्याची परवानगीसाठी ग्राहकाला 24 तास अगोदर एक नोटिफिकेशन पाठवावे लागेल.
कस्टमरच्या खात्यातून पैसे तेव्हाच डेबिट होतील, जेव्हा ते त्यास कन्फर्म करतील.
हे नोटिफिकेशन तुम्हाला एसएमएस किंवा ई-मेलद्वारे मिळू शकते.

4. गुंतवणुकीसंबंधी नियमात होईल बदल (Mutual fund related rules)

मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) आता म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांचे हित लक्षात घेऊन एक नवीन नियम केला आहे.
हा नियम असेट अंडर मॅनेजमेंट (AMC) म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणार्‍या ज्यूनियर कर्मचार्‍यांवर लागू होईल.

असेट अंडर मॅनेजमेंट कंपन्यांनुसार ज्यूनियर कर्मचार्‍यांना 1 ऑक्टोबर 2021 पासून ग्रोस सॅलरीचा 10 टक्के भाग त्या म्युच्युअल फंडच्या युनिट्समध्ये गुंतवावा लागेल.
तर 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत फेजवाईज हा सॅलरीच्या 20 टक्के होईल. यास सेबीने स्किन इन द गेम नियम सांगितले आहे.
गुंतवणुकीत लॉक इन पीरियड सुद्धा होईल.

 

5. LPG सिलेंडरच्या किमतीत होणार बदल (LPG price)

ऑक्टोबरपासून LPG सिलेंडरच्या किमतीत बदल होईल. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि कमर्शियल सिलेंडर (LPG gas cylinder) च्या नवीन किमती ठरवल्या जातात.

6. खासगी दारूची दुकाने बंद (Liquor shop)

ऑक्टोबरपासून दिल्लीत प्रायव्हेट दारूची दुकाने बंद होतील. 16 नोव्हेंबरपर्यंत केवळ सरकारी दुकानांवर दारूची विक्री होईल.
डेप्युटी सीएम मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत राजधानी दिल्लीला 32 झोनमध्ये विभागून लायसन्स वाटप प्रक्रिया केली आहे.
आता 17 नोव्हेंबरपासून नवीन धोरणांतर्गत दुकाने उघडतील.

 

Web Title : Auto Debit Cheque Book Pension Rules | alert changes from 1 october 2021 auto debit cheque book pension rule will changed check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | मुंबईसह राज्यात रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता

Nagpur Crime | धक्कादायक ! ‘या’ कारणामुळं महिलेनं You Tube वरील व्हिडीओ पाहून पोटातलं बाळ ‘पाडलं’, केला गर्भपात; जाणून घ्या प्रकरण

Multibagger Stock | 21.49 रुपयांचा स्टॉक झाला 343.5 चा, तीन महिन्यात 1 लाखाचे झाले 15.98 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?