76 हजार रुपये दंडाच्या 256 पावत्या नावावर जमा, अनभिज्ञ रिक्षाचालक ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे, आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत.

त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे खिसेकापू दंडामुळे धास्तावले असून नागरिक या दंडापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगत आहे. मात्र काही नागरिक आपल्यावर असलेला दंड भरताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सरकारने सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट दंड त्यांच्या खात्यावर टाकण्याचे काम सुरु केले आहे.

अशाच पद्धतीचा एक प्रकार सुरतमध्ये समोर आला असून येथील एका रिक्षाचालकाच्या नावे 256 पावत्या जमा झाल्या असून यामुळे त्याच्या नावावर जवळपास 76 हजार रुपये दंड जमा झाला आहे. शेख मुशर्रफ शेख रशीद असे या रिक्षाचालकाने नाव असून तो 2011 पासून सुरतमध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दंडाची पावती मिळाल्यानंतर तो ट्राफिक पोलीस आयुक्तांकडे गेला होता. मात्र त्याला तेथे निराशा हाती लागली. दरम्यान, 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात त्याच्या नावावर हा दंड जमा झाला असून हा दंड भरण्याशिवाय त्याच्यापुढे आता कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

Visit  :Policenama.com

You might also like