Auto Expo 2020 : जगातील सर्वात स्वस्त ‘इलेक्ट्रिक’ कार सादर, जाणून घ्या ‘फीचर्स’ आणि ‘किंमत’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतात सुरु असलेल्या ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली. GWM Pavilion ने ऑटो एक्सपोमध्ये इलेक्ट्रिक कार Ora R1 ला सादर करण्यात आले. ओरा ग्रेट वॉल मोटर्सची सब्सिडियरी आहे. Ora R1 जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.

अहवालात दावा आहे की Ora R1 ही कार एकदा चार्ज झाल्यावर 351 किलोमीटर धावेल. Ora R1 च्या बेस मॉडलमध्ये दोन एअरबॅग, ABS, रिवर्स पार्किंग सेंसर आणि कॅमरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हिल स्टार्ट एसिस्ट आहे. Ora R1 च्या टॉप ‘Goddess Edition’ मॉडलमध्ये ऑटोनोमस ब्रेकिंग आणि सहा एअरबॅग आहेत.

Ora R1 मध्ये 48 पीएस पॉवर आहे परंतु 125 NM ट्रॉर्क जेनरेट करते. Ora R1 ची लांबी 3.49 मीटर आहे. ही देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी सेलेरिओ या कारपेक्षा लहान आकाराची आहे. जर ही कार भारतात लॉन्च झाली तर ही टाटा टिगोर आणि रेनोच्या इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करेल. Ora R1 मध्ये फ्लोटिंग टाइप टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम फीचर देण्यात आले आहे.

याची बॅटरी 40 मिनिटात 80 टक्के चार्ज होते. Ora R1 ची किंमत $8,680 ते $11,293 म्हणजेच 6.2 लाख रुपये तर 8 लाख रुपये आहे. Ora R1 मध्ये 35KW ची मोटर लावण्यात आली आहे.