Auto Expo 2020 : मारुती 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 KM धावणारी ‘स्विफ्ट’ आणणार

पोलीसनामा ऑनलाइन –ऑटो एक्स्पो आजपासून सुरु झाला आहे. त्यामुळे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड एक्स्पोमध्ये नवीन सीएनजी आणि हायब्रिड कार लॉंच करणार आहे. त्याचबरोबर यामध्ये काही फिचर कारही असणार आहे. चीनच्या काही कंपन्या यावर्षी भारतात पदार्पण करणार असल्याने त्यांनी एकूण 20 टक्के जागा आरक्षित केलेली आहे. अशा परिस्थितीत भारताची सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी पुर्ण तयारी करुन या एक्स्पोमध्ये उतरणार आहे.

मारुतीने मिशन ग्रीन थीम ठरविली असून या एक्स्पोमध्ये त्याचीच काहीशी झलक लोकांना पहायला मिळणार आहे. 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने कन्सेप्ट फ्युचर एस दाखविली होती. त्यामुळे यावर्षी मारुती नवीन डिझाईन लॉंच करणार आहे. बीएस 6 मानकांमुळे मारुतीसह जवळपास सर्वच कंपन्यांना नवीन इंजिनच्या गाड्या लॉंच कराव्या लागणार आहे.

मारुतीची एकमेव 4 स्टार असलेली कार व्हिटारा ब्रेझाने 2016 भारतातील सर्वाधिक खपाची एसयुव्ही असल्याचा मान मिळवला आहे. लवकरच या कारचे फेसलिफ्ट येइल. कारमध्ये इंजिनच्या बदलासोबत आतून आणि बाहेरुन ही बदल पहायला मिळणार आहे.

मारुती लॉंच करणारी नवीन डिझाईनची कार कदाचित इलेक्ट्रीक असण्याची शक्यता आहे. या कारचे नाव कन्सेप्ट असणार आहे. ही कार एसयुव्ही कुपेसारखी असल्याचा अंदाज लावला जात आहे. कारण या कारचे डिझाईन मारुतीने पोस्ट केले आहे. एकाचवेळी मारुती या एक्स्पोमध्ये 17 गाड्या लॉंच करणार आहे. यामध्ये इग्निस फेसलिफ्ट, सेलेरिओ, एस-प्रेसो, वॅगन आर, स्विफ्ट, डिझायर, बलेनो, इर्टिगा, एस-क्रॉस, सियाझ एस, एक्सएल 6 यासोबत स्विफ्टचे हायब्रिड मॉडेल असणार आहे.