वाहन चालवणं खिशाला परवडणार, ऑटो ‘LPG’ होणार ‘स्वस्त’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मंदीसदृश्य परिस्थिती आहे, याचा फटका वाहन निर्मात्या कंपन्याना बसला आहे. यावर पर्याय म्हणून सरकार LPG वरील GST कमी करण्याचा विचार करत आहे. यामुळे आता वाहन चालवणे अधिक स्वस्त होऊ शकते. सध्या LPG वर 18 टक्के जीएसटी लागतो. सरकार आता यात कपात करुन 5 टक्के करण्याचा विचार करत आहे ज्याने उद्योग क्षेत्रात LPG चा वापर वाढेल. इंडियन ऑटो एलपीजी कोलिशनचे महानिर्देशक सुयश गुप्ता यांनी सरकारला जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. LPG, CNG ला इतर इंधनापेक्षा स्वस्त इंधन समजले जाते.

LPG वरील जीएसटी कमी करावा –

सुयश गुप्ता यांनी सरकारला सांगितले की, ऑटो LPG ला देखील CNG सारखेच स्वच्छ इंधन समजले पाहिजे आणि त्यावर देखील इंसेंटिव दिला पाहिजे. ते म्हणाले, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला प्रदूषणापासून रोखण्यासाठी या प्रकारच्या इंधनाला प्रोस्ताहन दिले पाहिजे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि GST कौन्सिलला त्यांनी पत्र लिहून त्यांनी LPG वरील जीएसटी दर 18 टक्क्यांनी कमी करुन 5 टक्के करण्याचा आग्रह केला आहे.

ऑटो एलपीजी किटवर जीएसटीचे दर 28 टक्क्यांहून कमी करुन 5 टक्के करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोस्ताहनासाठी 10,000 कोटी रुपये सब्सिडी देत आहे. आम्हाला सब्सिडीची गरज नाही, आम्हाला जीएसटी कपात होण्याची गरज आहे.

डिझेलसारखेच भरु शकतात LPG गॅस –

जगातील 70 देशात एलपीजीचा वापर केला जातो. इरान, भारत आणि पाकिस्तान सह 4 ते 5 देशात CNG चा वापर केला जातो. वाहनात वापरण्यात येणाऱ्या LPG चे सिलेंडर सीएनजीपेक्षा हलके असते आणि त्याला भरणे देखील पेट्रोल – डिझेल सारखे सोपे असेल.

घरगुती LPG गॅसवर लागतो 5 टक्के GST –

घरगुती एलपीजीवर 5 टक्के कर लागतो, परंतू वाहनात वापरण्यात येणाऱ्या LPG वर 18 टक्के जीएसटी लागतो.

आरोग्यविषयक वृत्त –