दिल्ली : वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल ‘चलन’ मिळालं तर आता घरबसल्या करा रद्द, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ल्लीत जागजागी वाहतूक पोलिसांनी ओव्हर स्पीडिंग, रेडलाइट जंपिंग आणि स्टॉप लाईनच्या पुढे गाडी थांबवणे यासारख्या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या लोकांची नंबरप्लेट ऑटोमॅटिक वाचून चलन तयार होते. परंतु बर्‍याच वेळा वाहनाच्या नंबरप्लेटवर नंबर योग्यरित्या लिहिलेले नसतात किंवा नंबरप्लेटवर चिखल उडाल्यास वाहनाचा नंबर स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे चलन चुकीचे कापले जातात. गेल्या काही दिवसांत अशा बर्‍याच तक्रारी समोर आल्या आहेत.

नंबरप्लेट नीट वाचता येत नसल्यामुळे ज्या व्यक्तीने चूक केली त्याऐवजी दुसर्‍याचेच चलन कापले जात आहे. जर चुकीचे चलन कापले गेले असेल, तर पुढील पद्धतीने ते रद्द केले जाऊ शकते.

जर एखाद्याचे चुकीचे चलन कापले गेले असेल, तर ती व्यक्ती वाहतूक पोलिस हेल्पलाइनशी संपर्क साधून याबाबत माहिती देऊ शकते.

Advt.

या व्यतिरिक्त आपली तक्रार ई-मेलद्वारे देखील नोंदवू शकता.
वाहतूक पोलिसांकडून पडताळणी केल्यानंतर काढलेले चुकीचे चलन रद्द केले जाते.
सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
याशिवाय ट्रॅफिक पोलिस लोकांशी सोशल मीडियाद्वारे एक फॉर्मेटही शेअर करत आहेत.
या फॉर्मेटमध्ये टप्प्याटप्प्याने असे सांगण्यात आले आहे की, चुकीचे चलन कापल्यास लोक त्यांची तक्रार कशी नोंदवू शकतात.

वाहतूक पोलिसांचे विशेष आयुक्त ताज हसन यांचे म्हणणे आहे की, चलनाच्या ऑटोमॅटिक यंत्रणेत अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत, कारण अनेकदा लोकांच्या वाहनाच्या नंबरप्लेटवर नंबर नीट लिहिले जात नाहीत, किंवा नंबरप्लेटवर चिखल उडालेला असतो, किंवा इतर वाहने असल्यामुळे नंबर स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे सिस्टम चुकीचे चलन जनरेट करते, परंतु यात जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.

तंत्रज्ञान ही एक प्रणाली आहे आणि त्याची अचूकता बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या कारणांमुळे चुकीचे चलन कापले जाते. म्हणूनच अशी व्यवस्था केली गेली आहे की, जर एखाद्याचे चुकीचे चलन कापले गेले तर ते रद्द केले जाऊ शकते.