PUC नसेल तर वाहन अपघात विमा मिळणार नाही, IRDAकडून नोटिफिकेशन जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाहनांचा अपघात झाल्यास आता विम्याचा दावा करण्यासाठी वाहन प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर 20 ऑगस्टपासून विमा कंपन्यांनी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करु नये, असे आदेश भारतीय विमा प्राधिकारणाने (IRDA) विमा कंपन्यांना दिले आहेत. यासंदर्भात आयआरडीएने नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

IRDAने विमा कंपन्यांसाठी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. त्यानुसार, विम्याच्या नुतनीकरणासाठी वाहन मालकाकडे पीयूसी असणं गरजेचं आहे. वाहनांचा विमा काढण्यासाठी यापुढे हे प्रमाणपत्र ग्राहकांना विमा कंपन्यांना द्यावं लागेल.

IRDA ने 20 ऑगस्ट रोजी या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. तसेच कंपन्या आणि ग्राहकांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं कसोशीनी पालन करण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने विमा कंपन्यांना आदेश दिले होते की, त्यांनी संबंधित वाहनाची पीयूसी तपासल्याशिवाय विम्याचे नुतनीकरण करु नये.

त्यामुळे पीयूसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंड लावला जात आहे. प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक वाहनाला त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकांनुसार तपासले जाते.त्यासाठी प्रदुषण तपासणी केंद्र असतात, ही तपासणी केंद्र प्रामुख्याने पेट्रोल पंपावर असतात.