Hero च्या ‘या’ स्वस्त बाईकवर मोठी सवलत, जाणून घ्या ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशावर कोरोनाचे संकट असल्याने अनेक उद्योगधंद्यावर मंदीचे सावट आहे. वाहन उद्योगावर मंदीचे सावट मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कंपन्यांकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळ्या सवलती देत आहे. चारचाकी प्रमाणेच दुचाकीवर देखील ऑफर देण्यात येत आहेत.

जर तुम्ही नवीन स्वस्त बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पेटीएम Hero Hf Deluxe Bs6 च्या खरेदीवर आकर्षक कॅशबॅक ऑफर देत आहे. आज तुम्हाला या बाईकवर मिळणारी ऑफर, किंमत आणि फिचर्स बद्दल सांगणार आहोत.

किंमत आणि ऑफर

Hero Hf Deluxe Bs6 ची प्रारंभिक किंमत 49 हजार रुपये इतकी आहे. या बाईकच्या खरेदीवर 7 हजार रुपयांचा कॅशबॅक ग्राहकांना मिळत आहे. Hero Hf Deluxe Bs6 मध्ये 97.2 CC एअर कुल्ड 4 स्ट्रोक सिलिंडर OHC इंजिन देण्यात आले आहे. जे 8000 Rpm वर 7.91 Hp आणि 6000 Rpm वर 8.05 Hp टॉर्क जनरेट करते. या बाईकची लांबी 1965 मिमी, रुंदी 720 मिमी. उंची 1045 मिमी आहे. Hero Hf Deluxe Bs6 या बाईकच्या इंधनाची टाकीची क्षमता 9.6 लीटर इतकी आहे. Hero Hf Deluxe च्या पुढील भाग 130 मिमी ड्रम ब्रेक आणि मागिल बाजूस 130 मिमी ब्रेक देण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like