‘महिंद्रा’नं लाँन्च केली सर्वात स्वस्त ‘बोलेरो’, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतात लोकप्रिय असलेली बोलेरो एसयूव्हीचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट लॉन्च केली आहे. कंपनीने अधिकृतपणे नवीन बोलेरोच्या फीचर्सची घोषणा केली आहे. मात्र, अशी अपेक्षा केली जात आहे की, यात एअरबॅग, पॉवर स्टीअरिंग, एअर कंडिशन, एबीएस, पार्किंग सेन्सर्स यासारख्या मूलभूत फीचर्स दिले जाऊ शकतात.

महिंद्राने मार्चमध्ये बोलेरोचे बीएस 6 मॉडेल लाँच केले होते. त्यावेळी तीन व्हेरिएंट B4, B6 आणि B6 (O) बाजारात लाँच केली होती. काही दिवसांपूर्वी कंपनीने SUV च्या किंमतीत 35 रुपयांपर्यंत सुट जाहिर केली होती. किंमतीतील वाढ आणि नव्याने लाँच केलेल्या महिंद्रा बोलेरोची किंमत 7.64 लाख ते 9.01 लाख (एक्स शोरुम) रुपयादरम्यान आहे.

BS6 महिंद्रा बोलेरो टॉप व्हेरिएंट्सबद्दल बोलायचे झाले तर यात स्टॅटिक बेडिंग हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स, ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टमसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, म्युझिक सिस्टम, पॉवर विंडोज, सेंन्ट्रल लॉकिंग आणि रीअर वॉश सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन बोलेरोमध्ये बीएस -6 कंपिलियंट, एमएचडब्ल्यूके 75, 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 76hp पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.