रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला नेले फरफटत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षाचालकाकडे लायसन्स मागणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षाचालकाणे फरफटत नेल्याची घटना घडली आहे. आशा गावांडे असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून नागरिकांनी या रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. महात्मा फुले चौक पोलिसांनी या मुजोर रिक्षाचालाकला ताब्यात घेतले आहे. नागेश अवालगिरी असे त्याचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17ce0c10-cc41-11e8-94cd-f72d31df103a’]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिला पोलिस कर्मचारी आशा गावंडे या कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असून त्या सायंकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियोजनाचे काम करत असताना त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात नागेश अवालगिरी या रिक्षाचालकाकडे लायसन्स मागितले. मात्र नागेशने रिक्षा भरधाव वेगाने पुढे नेली. गावंडे यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने रिक्षा भरधाव वेगाने पुढे नेल्याने गवंडे रिक्षासोबत काही अंतरावर फरफटत गेल्या.”

न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ डबे घसरले

नागेश याने रिक्षा न थांबवता तशीच पुढे नेल्याने रस्त्यावरील लोकांनी आरडाओरड करत नागेशला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत गावंडे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी रिक्षाचालक नागेश याला ताब्यात घेतले आहे.

[amazon_link asins=’B07B8RXBGB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b020cc5c-cc41-11e8-9ec1-7728ab08cbfc’]