चेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम ‘स्वस्त’ स्मार्टफोन, किंमत फक्त 3899 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला आहे. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. याची किंमत 3899 रुपये ठेवण्यात आली आहे. फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 5-6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं स्क्रीन रिझोलुशन 480*854 पिक्सेल्स आहे. हा फोन 1.4GHz quad core Spreadtrum SC9832E प्रोसेसरवर काम करतो.

या फोनची रॅम 1GB आहे. तर इंटरनल स्टोरेज 16 GB आहे जे 128 GB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. कंपनीने यात मिडनाईट ब्लू आणि अंबर कलर असे दोन ऑप्शन दिले आहेत. यात 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे.

मिळतील या ऑफर्स
LAVA Z41 स्मार्टफोनसोबत ग्राहकांना लाँचिंग ऑफर दिली जात आहे. याअंतर्गत जिओ ग्राहकांना 1200 रुपये इंस्टंट कॅशबॅक आणि 50 GB 4G डेटा मिळणार आहे. खास अशी की, हा फोन एवढा स्वस्त असूनही यात फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे.

लावा इंटरनॅशनल प्रॉडक्ट हेड तेजिंदर सिंह यांनी म्हटलं आहे की, हा स्मार्टफोन ग्राहकांच्या सर्व सोशल मीडिया गरजा जसे की युट्युब, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक पूर्ण करू शकतो. युट्युबवर सर्फिंग करताना युजर डेटा कंझम्शन कंट्रोल करू शकतात. यात डाऊनलोडिंग स्पीडही जास्त देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 2500 mAHची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 21 तासांचा टॉकटाईम, 6 तास वेब ब्राऊजिंग टाईम, 37 तास ऑडिओ प्लेबॅक आणि 6 तास व्हिडीओ प्लेबॅक तसेच 490 तास स्टँडबाय टाईम देतो.

Visit : Policenama.com