Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन

पोलीसनामा ऑनलाइन : Avadhoot Gupte | लोकप्रिय संगीतकार अवधूत गुप्ते आजही प्रेक्षकांना त्याच्या गाण्याने वेड लावतो. मराठी संगीताला पहिल्यांदाच रॉक म्युझिकची ओळख अवधूतने करून दिली होती. त्याचबरोबर अवधूतने आपल्या गाण्याने मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्याचा ‘ऐका दाजीबा’ पासून ते ‘जय जय महाराष्ट्र माझा’ पर्यंतच्या सर्वच गाण्यांनी लोकप्रियतेची उंची गाठली आहेत. आज अवधूत त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत आहे. आज अवधूतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात अवधूतने राजकारणावर आधारित ‘झेंडा’ हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता. या चित्रपटामागील काही रंजक गोष्टी. आजही या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ज्या गोष्टीवर भाष्य करण्याची कोणाची तयारी नव्हती त्यावर चित्रपट करण्याचे धाडस अवधूतने केले होते. या चित्रपटामुळे खुद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अवधूतला फोन केला असल्याचा किस्सा अवधूतने एका कार्यक्रमा दरम्यान सांगितला आहे. (Avadhoot Gupte)

झेंडा हा चित्रपट तेव्हाची महाराष्ट्रातील राजकारणातील खरी परिस्थिती दाखवणारा चित्रपट ठरला होता. राजकीय कहलामुळे भावाभावात आणि पक्षात पडलेली फुट या चित्रपटातून दाखवण्यात आली होती. चित्रपट जरी काल्पनिक असला तरी प्रेक्षकांना त्यातील रोख कळाले होते. या चित्रपटातील ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हे गाणे मात्र आजही प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अवधूतला अनेक धमक्या आल्या होत्या. घराबाहेर निदर्शने देखील झाली होती. या सर्व गोष्टींमुळे अवधूतने गोव्याला जाऊन काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंबई सोडून गोव्यात गेला. याच दरम्यान एका मासिकात झेंडा प्रदर्शित झाल्यानंतर शिवसेना अवधूतच्या पाठीशी उभी राहिली नाही असा लेख छापून आला होता आणि हा लेख खुद्द बाळासाहेबांनी वाचला आणि लगेच अवधूतला फोन केला. (Avadhoot Gupte)

अवधूतने मुंबई सोडून गोव्याला जाताना आपला फोन बंद ठेवला होता.
तर यावेळी बाळासाहेबांनी त्यांच्या पत्नीच्या फोनवर त्याला कॉल केला.
बाळासाहेब अवधूतला म्हणाले, “एका मासिकात शिवसेना तुझ्या पाठीशी उभी राहिली नाही असे लिहून आले आहे.
तू हे पाहिलं वाचलंस का? तुला काय वाटतं? यावर अवधूतने नाही असे उत्तर दिले.
मग पुढे बोलताना बाळासाहेब म्हणाले, “शिवसेना कायम तुझ्या पाठीमागे उभी राहिली आहे.
जर तुला असं वाटत नसेल तर तू माझ्याकडे तुझा पैशा वाचून आणखीन कसलेही नुकसान झाला असेल तर
हा बाळासाहेब ठाकरे तुझ्या बरोबरीने उभा राहील. मी तुझ्यासोबत आहे”.
तेव्हा बाळासाहेबांचे हे शब्द ऐकल्यानंतर अवधूतचा जीव भांड्यात पडला होता आणि हा किस्सा अवधूत आजही
विसरू शकत नसल्याचे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले आहे.

Web Title :- Avadhoot Gupte | after zenda movie balasaheb thackeray called avadhoot gupte know unknown fact

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | चिन्ह आणि नाव गेल्यावर अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले – ‘लवकरात लवकर…’

Prakash Raj | अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला बोगस सिनेमा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांनी दिले ‘हे’ सडेतोड उत्तर