काश्मीरमध्ये हिमस्खलनात 4 जवानांसह 9 जणांचा मृत्यू, 6 BSF जवानांना वाचवण्यात यश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर काश्मीरमध्ये रविवारी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे सोमवारी अनेक ठिकाणी हिमस्खलन झाले. यात चार जवानांसह 9 जणांचा मृत्यू झाला. माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ या हिमस्खलनात सैन्याची चौकी बर्फाखाली गेली. या भागात तैनात 7 जवानांमधील 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यात बर्फात अडकलेल्या एका कॉन्स्टेबलला बरेच प्रयत्न करुन देखील वाचवण्यात यश आले नाही.

या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत 3 जवानांसह 5 नागरिकांचा मृत्यू झाला. बर्फाखाली अडकल्याने 3 जवान शहीद झाले. तर एक अजूनही बेपत्ता आहे. मध्य काश्मीरमध्ये गांदरबल जिल्ह्यात हिमस्खलनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. यात दोन मुलांचा आणि त्यांच्या वडीलांचा समावेश आहे.

सैन्याकडून सांगण्यात आले की, रामपूर आणि गुरेज सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या कारणाने सेनेच्या चौकीचे नुकसान झाले. तेथे देखील एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. बर्फात अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी वायुसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. बर्फाचे प्रमाण जास्त असल्याने कुपवाडा, बांदीपोरा आणि बारामुल्ला जिल्ह्यात अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. उत्तर आणि मध्य काश्मीरमध्ये आणखी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सैन्याला 4 जणांचे जीव वाचवण्यात यश –
गांदरबल जिल्ह्यात कुल्लन भागात सोमवारी रात्री बर्फाचा डोंगर कोसळल्याने बर्फाच्या ढिगाऱ्याखाली 9 जण अडकले होते. त्यानंतर जवानांनी प्रयत्नपुर्वक अनेकांना बाहेर काढले, तेथून 4 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले. तर 5 जणांचा जीव गेला.

फेसबुक पेज लाईक करा –