Avatar: The Way of Water | जेम्स् कॅमरूनच्या ‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’ ची बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई; पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी..

पोलीसनामा ऑनलाईन – दिग्दर्शक जेम्स् कॅमरूनचा बहुचर्चित ‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) काल भारतात प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरूवात करत चांगलीच कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी ‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मात्र या चित्रपटाच्या आगमनाची वाट प्रेक्षक पाहत होते.

‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) हा सिनेमा अवतारचा सिक्वेल आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर हॉलीवूडमधील सर्वात जास्त कमाई करण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यातच आता ‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’ या सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे. बॉलीवूडसंबंधी न्यूज देणाऱ्या एका न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’   या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ३८.५० ते ४०.५० करोड रूपयांची कमाई केली आहे. मात्र हा सिनेमा ऐवेंजर्सः एन्ड गेम या सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे रेकॉर्ड मोडू शकला नाही. ऐवेंजर्सः एन्ड गेम या सिनेमाचे पहिल्या दिवशीची कमाई ही ५३.१० करोड इतकी आहे.

भारतात ‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’ या सिनेमाने सगळ्यात जास्त कमाई
ही दक्षिणेत केली आहे. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ या दक्षिणेतील पाच राज्यांत मिळून या सिनेमाने २२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर उर्वरित भारतात या सिनेमाने १७ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

‘अवतार: दि वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) या सिनेमात सॅम वर्दिंगटन आणि झो सॅलडाना
हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द हॉलीवूड दिग्दर्शक जेम्स् कॅमरून यांनी
केले आहे. हा सिनेमा १६ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे.

Web Title :-Avatar: The Way of Water | avatar the way of water box office collection day 1 james cameron

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MVA Mahamorcha | अखेर पोलिसांनी महामोर्चाला दिली परवानगी, शरद पवार म्हणाले- ‘एकनाथ शिंदेंनी सांगितले होते…’

Health Tips | हिवाळ्यात कफवर रामबाण आहे हा उपाय, सेवन करताच दूर पळेल खोकला