Avatar : The Way of Water | बहुचर्चित ‘अवतार 2’ चित्रपट केरळमध्ये ‘या’ कारणामुळे होणार नाही रिलीज

पोलीसनामा ऑनलाइन : Avatar : The Way of Water | अवतार या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली होती. चित्रपटप्रेमींना याच्या पुढच्या भागाची उत्सुकता होती, तर आता जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अवतारच्या पहिल्या भागाच्या कमाईचे रेकॉर्ड तब्बल दहा वर्षांनी मारवेलच्या ‘एंडगेम’ या चित्रपटाने मोडले होते. आता अवतार द वे ऑफ वॉटर या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे ती म्हणजे केरळ राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. (Avatar : The Way of Water)

या निर्णयामागे मोठे कारण असल्याचे ‘The Film Exhibitors United Organisation of Kerala (FEUOK)’ या केरळच्या संस्थेने सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते आणि FEUOK यांच्यात चित्रपटाचा नफा वाटून घेण्याबद्दल बोलणी फिस्कटली असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

याविषयी बोलताना FEUOK चे अध्यक्ष के. विजयकुमार म्हणाले, “आम्ही या चित्रपटावर बंदी घालत नाही एवढेच काय आम्ही कोणत्याही चित्रपटावर बंदी घालत नाही. मात्र, या चित्रपटांनी घातलेल्या अटी आम्हाला मान्य नाहीत. अवतार 2 हा चित्रपट केरळमध्ये प्रदर्शित करणार नाही. यामध्ये निर्मात्याने मध्यस्थी करावी अशी आमची अपेक्षा आहे.” (Avatar : The Way of Water)

ही परिस्थिती उद्भवण्यामागचे नेमके कारण म्हणजे अवतारच्या पहिल्या आठवड्यातील नफ्यापैकी 60% नफ्याची
मागणी वितरकांनी केली आहे. मात्र, चित्रपटगृहांचे मालक 55% पेक्षा जास्त एकही पैसा देण्यास तयार नसल्याने
ही अडचण निर्माण झाली आहे. जर या अडचणीवर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर तब्बल 400
स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने चांगलाच फटका बसू शकतो. हा चित्रपट येत्या 16 डिसेंबरला
चित्रपट गृहांमध्ये झळकणार आहे, तर पहिल्याच दिवशी हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title :- Avatar : The Way of Water | james camerons most awaited avatar the way of water will not get released in kerala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

Pune Crime | पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त