हॉलिवूडपट ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’चा डायरेक्टर निघाला ‘भाईजान’ सलमानचा फॅन !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सलमन खान गेल्या 3 दशकांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. त्याची स्टाईल, फॅशन त्याची भूमिका लोक सारं काही कॉपी करू पहात असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का हॉलिवूडचा एक दिग्गज डायरेक्टर सलमान खानचा फॅन आहे. अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम डायरेक्ट करणाऱ्या या डायरेक्टरचं नाव आहे जो रुसो.

जो रुसोनं एका मुलाखीत बोलताना इंडियन सिनेमा आणि बॉलिवूडवर सविस्तर भाष्ये केलं. यावेळी त्यानं सलमान खानचं खूप कौतुक केलं. जो म्हणाला, “सलमान खान चांगला अ‍ॅक्टर आहे. तुम्ही दबंग सिनेमा पहा. मला तो खूप आवडला. या सिनेमाची वेगळीच एनर्जी आहे. याशिवाय कॅमेरा वर्कही कमालीचं आहे. सिनेमात सलमान खानची अ‍ॅक्टींग कितीही फनी असली तरीही तो स्क्रिनवर जबरदस्त वाटतो.”

याआधीही रुसोनं बॉलिवूडवर भाष्य केलं होतं. हैराण करणारी बाब अशी की, तेव्हाही त्यानं असंच सलमान खानचं भरभरून कौतुक केलं होतं. पुन्हा एकदा जो रुसो सलमान खानच्या अॅक्टींगवर फिदा होताना दिसत आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.