‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या स्पेशल स्क्रिनिंगमधून सुशांत सिंह राजपूत बाहेर ; कारण कृती सेनन ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा सिनेमा नुकताच देशभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीच या सिनेमाने अनेक विक्रम केले. जगभरात या सिनेमाची क्रेझ असल्याचं दिसत आहे. यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूडमध्येही याचे अनेक चाहते आहेत. मुंबईथ सिने कलाकारांसाठी या सिनेमाची स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, अनन्या पांडे, दिशा पाटनी, असे अनेक कलाकार दिसले. यावेळी सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन हेदेखील हा सिनेमा पाहण्यासाठी पोहोचले होते. सुशांत आणि कृती खूप दिवस रिलेशनशिपमध्ये होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृती सेनन आपली बहिण नुपूर सेनन हिला घेऊन अर्धा तास आधीच सिनेमा पाहण्यासाठी पोहोचली होती. जेव्हा सुशांतने एंट्री केली तेव्हा दोघीही बहिणी आपल्या जागेवर बसल्या होत्या. यावेळी एक्स कपलच्या नजरानजरेला काहीच चान्स नव्हता. यानंतर मात्र इंटरवलमध्ये या दोघांच्या समोरासमोर येण्याची शक्यता होती. परंतु सुशांत मात्र 15 मिनिट आधीच सिनेमागृहातून बाहेर पडला आणि सर्वांनाच त्याने चकित केले. सिनेमाचा एक महत्त्वाचा सीन सुरु असतानाच सुशांत तेथून बाहेर पडला.

हा दोघांविषयी सांगायचे झालेच तर राब्ता या सिनेमाच्या शुटींग दरम्यान हे दाघे एकमेकांच्या जवळ आले होते. परंतु नंतर काही वैयक्तीक कारणांमुळे हे दोघेही वेगळे झाले. समोर आलेल्या वृत्तांनुसार, वेगळे झाल्यानंतर दोघांचंही बोलणं एकदमच बंद झालं. वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, सुशांत सिंह राजपूतकडे सध्या ड्राईव्ह, छिछोरे आणि दिल बेचारा असे सिनेमे आहेत. कृती सेनन अर्जुन पटीयाला, हाऊसफुल 4 आणि पानीपत या सिनेमांमध्ये दिसणार आहे.