Avengers Endgame Trailer In Hindi : पृथ्वीवर पुन्हा परतला आयर्न मॅन !

तुम्ही ट्रेलर पाहिलात का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॅप्टन मार्वेलच्या अॅवेंजर्स सीरिजचा सर्वात मोठा हाॅलिवूडपट अॅवेंजर्स एंडगेम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित ठरत असलेल्या कॅप्टन मार्वेलच्या अॅवेंजर्स सीरिजच्या चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे असं दिसत आहे. या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रदर्शित होऊन काही कालावधीतच या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात व्ह्युड मिळताना दिसत आहे.

रुसो ब्रदर्सने २ मिनीटे २८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये संपूर्ण चित्रपट जणू दाखविला आहे. एका गुहेत बनलेला आयर्न मॅन आणि एका इंजक्शनमुळे डीएनएत बदल होऊन तयार झालेला कॅप्टन अमेरिका आणि त्याचप्रमाणे अमेरिका व अन्य ग्रहावरून आलेले थोर, हाॅक आय, ब्लॅक विडो या ट्रेलरमध्ये दिसत आहे. मुख्य म्हणजे आजही हे सारे सुपरहिरोज जगात असून आपल्या मित्रांच्या मृत्यूनंतर ते सारेजण एकजूट होतात. त्यातच त्यांना कॅप्टन मार्वेलची साथ मिळते. या सर्वामुळे या ट्रेलरची रंगत वाढल्याचे दिसत आहे. हा ट्रेलर पाहताना रुसो ब्रदर्सने २ मिनीटे २८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये संपूर्ण चित्रपट जणू दाखविला आहे असे वाटत आहे.

दरम्यान, ‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चे लवकरच भारतात प्रमोशन होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शक जो रूसो लवकरच या प्रमोशनसाठी भारतात येणार आहेत. हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असेही समजत आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us