Avian H5N8 Flu in Humans : माणसांमध्ये पोहचला बर्ड फ्लूचा व्हायरस, रशियात पोल्ट्री फार्मचे 7 लोक संक्रमित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियामध्ये माणसांमध्ये बर्ड फ्लूच्या व्हायरसच्या ट्रान्समिशनचे पहिले प्रकरण समोर आले आहे. रशियाने या गोष्टीस दुजोरा दिला आहे की, एच5 एन8 एव्हियन फ्लू म्हणजे बर्ड फ्लूचा व्हायरस माणसांमध्ये आढळला आहे. रशियाच्या रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी शनिवारी माहिती दिली की, एका पोल्ट्री फार्मचे कर्मचारी बर्ड फ्लूने संक्रमित आढळले आहेत. रोसपोत्रेनादजोरचे वेक्टर रिसर्च सेंटरने माणसांमध्ये हा व्हायरस शोधून काढला आहे.

अन्ना पपोवा यांनी रशिया 24 ब्रॉडकास्टरला माहिती दिली की, डिसेंबरच्या महिन्यात रशियाच्या दक्षिणमध्ये एका पोल्ट्रीमध्ये या महामारीने इशारा दिला होता. तर काम करणारे सात लोक संक्रमित आढळले आहेत. अन्ना पपोवा यांनी म्हटले, संक्रमित सर्व लोक बरे आहेत. त्यांना अतिशय हलकी लक्षणे आहेत.

अलिकडच्या दिवसात भारतातील अनेक राज्यात बर्ड फ्लूच्या प्रकरणांना दुजोरा मिळाला होता. अनेक ठिकाण कावळे आणि अन्य पक्षी मृतावस्थेत आढळले होते. याशिवाय काही ठिकाणी अशा कोंबड्यांना मारण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले होते. दिल्लीत सुद्धा सरकारने कोंबडी बाजार बंद केला होता, मात्र नंतर सरकारने उघडण्याची परवानगी दिली होती.