Lockdown : एअर इंडियाची तिकिट विक्री 30 एप्रिल पर्यंत बंद !

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 14 एपिृलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे आता सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने 30 एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

देशांतर्गत पृवास तिकीट विकृी बंद असल्याबाबत याआधी सिव्हिल एव्हिएशनकडूनही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. विमान कंपन्या 14 एप्रिल नंतर कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात. 25 मार्च रोजी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तो 14 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे, असे सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितले होते.

दरम्यान, शुक्रवारी एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संघटनेने वैमानिकांच्या वेतनात करण्यात येणार्‍या 10 टक्क्यांच्या कपातीच्या निर्णयाचा विरोध केला. हा निर्णय अयोग्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वक्तव्याचीही आठवण करून दिली. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात करू नये या पंतप्रधानांच्या वक्तव्याची त्यांनी आठवण करून दिली. एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांनी कंपनीच्या सीएमडींना एक पत्र पाठवले आहे. भत्त्यांमध्ये 10 टक्क्यांच्या कपातीच्या निर्णयाने मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह आणि संचालकांनी स्वत:ला वाचवले आहे. त्यांचे भत्ते कमा आहेत. आम्ही हा निर्णय स्वीकारत नाही, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.